Monday, 27 January 2014

महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठातील संचालक व अधिष्ठाताच्या 10 जागा
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेअंतर्गत महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठातील संचालक -विस्तार शिक्षण (2 जागा), संचालक- संशोधन (4 जागा), अधिष्ठाता-कृषी (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती (1) http://www.maharashtra.gov.in (2) http://www.mcaer.org (3) http://mpkv.mah.nic.in (4) http://pdkv.ac.in (5) http://mkv2.mah.nic.in (6) http://www.dbskkv.org या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख अभियंता-विकास नियोजन खात्यात 2 जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रमुख अभियंता-विकास नियोजन खात्याच्या आस्थापनेवर उपप्रमुख नगर रचनाकार-विकास नियोजन (१ जागा), उप प्रमुख नगररचनाकार-स्थानिक क्षेत्र योजना (1 जागा) ही पदे करार तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 24 जानेवारी 2014 आहे.


औरंगाबाद जिल्हा निवड समितीद्वारे 45 जागांसाठी भरती

औरंगाबाद जिल्हा निवड समितीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी (29 जागा), लिपिक टंकलेखक (16 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती http://www.aurangabad.nic.in/ http://www.aurangabadexam.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 31 जागा
परभणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी (14 जागा), लिपिक टंकलेखक (14 जागा), लघुटंकलेखक (2 जागा), वाहनचालक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 फेब्रुवारी 2014 आहे. अर्ज व इतर माहिती http://parbhani.nic.inhttp://www.collpbn.mahagovjobs.com/http://parbhani.gov.in/htmldocs/Coll_padbharti_January_2014_advertisement_22_01_2014.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर 13 जागा
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक टंकलेखक (5 जागा), तलाठी (7 जागा), लघुटंकलेखक (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://osmanabad.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालयातील ध्वनीयंत्रणा चालक तथा यांत्रिकीच्या 14 जागा
महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालयातील ध्वनीयंत्रणा चालक तथा यांत्रिकी (14 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 फेब्रुवारी 2014 आहे. अधिक माहिती http://mls.org.in/pdf/sound9.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सातारा जिल्हा निवड समिती अंतर्गत जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये 57 जागा
सातारा जिल्हा निवड समिती अंतर्गत जिल्ह्यातील नगरपरिषदांमध्ये कनिष्ठ बांधकाम पर्यवेक्षक/अतिक्रमण निर्मुलन अधिकारी (10 जागा), कनिष्ठ विद्युत पर्यवेक्षक (7 जागा), ज्युनिअर प्रोग्रामर/फॅसिलिटी मॅनेजर (7 जागा), कनिष्ठ पाणीपुरवठा, जलनि:स्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक (13 जागा), सहायक लेखापरीक्षक/सहायक लेखापाल (12 जागा), सहायक अग्निशमन स्थानक परिवेक्षक (8 जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/dpo2013/CMS/Content_Static.aspx?did=170 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment