Saturday, 11 January 2014

महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव कार्यालयात 31 जागा
महाराष्ट्राच्या राज्यपालांचे सचिव कार्यालय व राज्यपाल परिवार प्रबंधक कार्यालयात सहायक (3 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), लिपिक टंकलेखक (4 जागा), संदेशवाहक (6 जागा), माली (5 जागा), सफाईगार/स्वच्छक (2 जागा), सहाय्यक-खाद्यपेय (4 जागा), प्लेट वॉशर (2 जागा), कचरा मजदूर (2 जागा), टेनिस बॉय (1 जागा), झिलाईकार-पॉलिशर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतच्या 9 जानेवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.exxononline.net/rajbhavan या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणेच्या नाशिक विभागीय कार्यालयात 14 जागा
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या औरंगाबाद विभागीय उपसंचालक, भूजल सर्वेक्षण यंत्रणा या कार्यालयात सर्वेक्षक (8 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली वरिष्ठ सहाय्यक-आरेखक (1 जागा), भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक (५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/GSDA%20Advertisement-Aurangabad.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

औरंगाबाद येथील शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागारमध्ये 3 जागा
महाराष्ट्र शासनाच्या औरंगाबाद येथील सहायक संचालक, शासकीय लेखनसामग्री व ग्रंथागारमध्ये शिपाई (2 जागा), मजूर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात व माहिती https://www.maharashtra.gov.in/Site/upload/CareersandOpportunities/Marathi/Scan_6-Aurangabad.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

माझगाव डॉकमध्ये कुशल व अकुशल तांत्रिक वर्गाच्या 54 जागा
माझगाव डॉकमध्ये कुशल व अकुशल तांत्रिक वर्गाची भरती होणार आहे. यामध्ये ज्यु. ड्राफ्टसमन (2 जागा), भांडारपाल (3 जागा), फिटर (2 जागा), स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर (1 जागा), पाईप फिटर (11 जागा), रिगर (10 जागा), कॉम्प्रेसर अटेंडंट (1 जागा), लश्कर (1 जागा), मिलराईट मेकॅनिक (2 जागा), इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (2 जागा), पेंटर (5 जागा), सुतार (4 जागा), कंम्पोझाईट वेल्डर (3 जागा), सुरक्षा शिपाई (1 जागा), अग्निशामक (2 जागा), युटिलिट हँड (3 जागा), चिपर ग्राईंडर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.mazagondock.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 70 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयात विविध विषयातील प्राध्यापक (३२ जागा), प्राचार्य (1 जागा), विभाग प्रमुख (4 जागा), प्राध्यापक (4 जागा), सहयोगी प्राध्यापक (9 जागा), सहायक प्राध्यापक (10 जागा), प्राचार्य, शासकीय विधी महाविद्यालय (1 जागा), महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व वैद्यकीय द्रव्ये विभागातील प्राध्यापक- शरीरक्रिया (4 जागा), प्राध्यापक-त्वचा व गुप्तरोगशास्त्र (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती www.mpsconline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 4 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सामान्य प्रशासन विभागातील भाषा संचालक- सामान्य राज्य सेवा गट अ (1 जागा), बृहन्मुंबई महानगर पालिकेतील प्राध्यापक-हृदयरोग चिकित्साशास्त्र (1 जागा), गृह विभागातील पोलीस उपअधिक्षक/सहायक पोलीस आयुक्त-मोटार परिवहन (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती www.mpsconline.gov.in व www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

ठाणे जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रात वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षकाच्या २ जागा
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ठाणे जिल्हा क्षयरोग नियंत्रण केंद्रात वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक-जव्हार (1 जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा पर्यवेक्षक-मुरबाड (1 जागा) ही पदे करारतत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. 15 जानेवारी 2014 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतच्या 9 जानेवारी 2014 च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

No comments:

Post a Comment