Friday, 3 January 2014

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयात 95 जागा

महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयात लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), यांत्रिक निर्देशक (5 जागा), सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (14 जागा), सांख्यिकी सहाय्यक (5 जागा), वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी अन्वेषक (22 जागा), ग्रंथपाल (१ जागा), कनिष्ठ लिपिक/वसुली सहाय्यक/रोखपाल/मत्स्यक्षेत्र प्रगणक/लिपिक नि टंकलेखक (32 जागा), वाहनचालक (3 जागा), क्षेत्र समाहारक (1 जागा), मत्स्यक्षेत्रिक (6 जागा), शिपाई (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी 15 जानेवारी ते 31 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये 1 जानेवारी 2014 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/fisheries या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये कनिष्ठ लिपिकच्या 4 जागा

संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारितील औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये कनिष्ठ लिपिक (4 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी 2014 आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/cantonment या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात शिपाई व लिपिक पदाच्या 589 जागा

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागातील विविध कारागृहात गट ड ची पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये कारागृह शिपाई हे पद दक्षिण विभाग मुंबई यांच्या अधिनस्त कारागृहात (१११ जागा), पश्चिम विभाग, पुणे (126 जागा), मध्य विभाग, औरंगाबाद (201 जागा), पूर्व विभाग, नागपूर (103 जागा) ही पदे तसेच लिपिक पदाच्या जागा या दक्षिण विभाग, मुंबईमध्ये (12 जागा), पश्चिम विभाग, पुणेमध्ये (9 जागा), मध्य विभाग, औरंगाबादमध्ये (11 जागा), पूर्व विभाग, नागपूरमध्ये (16 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2014 आहे. यासंबंधीची अधिक माहिती व अर्ज www.mahaprisons.gov.in व http://oasis.mkcl.org/dig या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. 

No comments:

Post a Comment